गुगली

गुगली

थिएटरबाहेर थांबलो होतो मित्रांबरोबर
गर्दीत कुठुनशी झाली तिच्याशी नजरानजर

गोड गुलाबी हसणारी नाजुक सुंदर दिसणारी
कुडता अन्‌ सलवार घातलेली शालीन ती सुंदरी

सेकंदभरात झाला मनाचा हिशोब तयार
हिच्याबरोबर आयुष्याचे गणित नक्कीच जुळणार

मैत्रिणींशी कुजबुजत काहीतरी तिने ठरवले
'विचारू का त्याला' एवढेच मी ऐकले

येताना पाहून तिला मित्र माझे घाबरले
मती माझी कुंठली अन ह्रदयही थांबले

अगदी जवळ येऊन तिने माझा हात हातात घेतला
म्हटली, "तुझा चेहरा मला माझ्या भावासारखा वाटला"

"बंधु माझा राहत असतो दूर शहरी 
रक्षाबंधनास येशील का तू माझ्या घरी"

गुगलीने तिच्या ह्या झाली माझी दांडी गुल
सावरतोय ह्यातून तोच ती म्हंटली "एप्रिल फुल"

ही कविता कोण्या एका  मिलिंदने लिहीली होती
आणि मला २००४ साली ईमेलने आली होती.

No comments: