मुंबई ते मिलानो

३१ ऑक्टोबर २०१९

आमच्या प्रवासाला ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५-३० वा सुरू झाली जेव्हा आम्ही मुंबई विमानतळा कडे घरून प्रयाण केले.  आमच्या सवयी प्रमाणे आम्ही दिलेल्या वेळेच्या बरच आधी विमानतळावर होतो.  कालांतराने वीणा वल्डची मंडळी  आली.

वीणा वर्डची लोक आणि आमचा टूर लीडर आम्हाला क्रमांक ४ च्या स्थानका वर भेटणार होते. याच ठिकाणी भारताचा झेंडा पण  असतो.

आम्हाला आधीच सांगण्यात आल्या प्रमाणे इंशुर्न्सचे कागद आणि काही खाद्य पदार्थ देण्यात आले.  आम्ही पहिले आलेल्यां पैकी असल्या मुळे आम्हाला आमचे कागद आणि खाण्याच साहित्य पण लगेच मिळाले आणी ते  घेऊन विमानतळाच्या पहिल्या एंट्री पॉइंट कडे पळालो. इथून आत शिरल्या वर मग बाहेर पडण सोप नसतं.
सर्व प्रथम चेक इन केल कारण  खिडकीची जागा पकडायची होती. तशी ती मिळाली पण.

त्या नंतर सिक्युरीटी चेक - एमिग्रेशन वगैरे सोपस्कार संपवून मोकळे झाल्यावर भूक खूप लागलेली असल्या मुळे तिथल्या हॉटेल कडे धाव घेतली.

मुंबईचे विमानतळ अप्रतिम आहे यात वाद नाही आणि गेल्या काही वर्षा आता फोट काढायला मुभा असल्या मुळे फोटो हे काढले जातातच.




अजून सहप्रवाशांची ओळख अशी झालेलीच नव्हती. हं पण हे आपल्या बरोबर इटलीला असणार आहेत हे लक्षात येउ लागल होत.  तसे सगळेच मराठी भाषिक होते.

आणि आमच्या टूर लीडर पण बरोबर होताच.

कालांतराने ओमान एयरच विमानही एयरो ब्रिजला लागलं.


ठरल्या वेळे प्रमाणे ओमान एयरच्या प्लाईट क्रमांक WY-202 ने मुंबई हून १०-३० च्या सुमारास टेकऑफ केले. तो छान झाला आणि आम्ही मुंबई आणि त्याच बरोबर देश सोडला.

आमच्या प्रवासाची आता खऱ्या अर्थाने  सुरवात झाली होती.

हा प्रवास जवळ जवळ संपूर्ण अरबी समुद्रावरून असल्या मुळे खिडकीतून दूर दूर पर्यंत फक्त समुद्रच दिस होता.





सुमारे अडीच तासाचाच्या प्रवासा नंतर परत जमीन दिसु लागली व
मग थोड्याच वेळात  आम्ही मस्कत विमानतळावर उतरलो. स्थानिक वेळ दुपारचे १२.

विमानतळावर पोचल्या वर टूर लीडर नचितकेत ने सर्वांची हाजेरी घेतली.  त्या वरून आपल्या बरोबर कोण कोण आहे याची थोडी कल्पना आली.

हे विमानतळ इतर विमानतळांपेक्षा फार वेगळ मात्र नव्हतं.







 
प्रत्येक विमानतळावर अर्थातच काही वेग दिसत किंवा लक्षात येतं.   एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे हिंदी मधून प्रवेश निषेध आणि तेच बांग्ला मधून पण. याचा अर्थ आपण समजू शकतो की इंग्रजी न कळणारे हिदी आणि बांग्ला भाषी लोक बहू संख्येने येत असणार.


इथे प्रवाशांसाठी बसण्याची काही वेगळी आसने होती. ती  दिसायला  जरी आकर्षक वाटली तरी  त्याचा फारसा वापर होताना दिसला नाही.

















खरतर बसल्या वर पाठीला छान वाटत होतं पण प्रवसात ज्या आरामाची गरज होती ती गरज मात्र ही आसन पूर्ण करत नव्हती.


आमचा पुढचा प्रवास मग तीन तासांनी सुरू झाला.  हा प्रवास आता साडे सात तासांचा होता.  आणि हो उत्तरेस होत असल्या मुळे बाहेर अंधार पण लवकर झाला.  आता मधे मधे विमानातील खान पान सेवा वगैरे सुरू होती. अनेक जण खुर्ची समोरच्या स्क्रीनवर लोकांचं सिनेमा, सीरीयल बघण्यात पण मग्न होती. या स्क्रीन वर विमानाचा प्रवास कसा होत आहे हे पण दाखण्यात येत होतं.



आमचा प्रवास आता उत्तर पश्चिम दिशेने होत होता. त्यात या  दोन शहरांनी माझं लक्ष वेधल. एक होत तुझला आणि दुसरं बन्जा लुका.

स्थानिक वेळे प्रमाणे आम्ही सुमारे सायं ७-३० वा मिलानो ला पोचलो.  पण इटलीची वेळ भारताच्या ३-३० तास मागे असल्या मुळे आमच्या साठी मात्र रात्रीचे ११ वाजले होते.  इटलीतदेशात प्रवेश करण्या पूर्वीचे सोपस्कार म्हणजे एमिग्रेशन वगैरे करून मग आपले सामान घेऊन बाहेर पडण्यात सुमारे तास भर गेला.

विमानतळा बाहेर असलेल्या बस कॅप्टनची ओळखकरून दिली.  आता पुढचे ७ दिवस आमचा याच बसने प्रवास होणार होता.

















No comments: