book review उत्क्रांती - लेखिका सुमती जोशी

उत्क्रांती - लेखिका सुमती जोशी

अरविंद परांजपे, आयुका, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे ४११००७

सूर्यमालेच्या निर्मिती बद्दल शास्त्राज्ञांत एकमता ने सांगतात त्या प्रमाणे सूर्य आणि ग्रहांची निर्मिती एकाच वेळी झाली होती सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी. आज आपल्या माहीती प्रमाणे पृथ्वी शिवाय इतरत्र सजीव आढळत नाहीत. मग विश्वात इतत्र सजीव नसतीलच का? खगोलशास्त्रज्ञांच्या मते परिस्थितीजन्य पुरावे आपल्याला हेच सांगतात की विश्वात इतरत्र सजीव असले पाहीजेत. पण अनेक जीवशास्त्रज्ञांच मत आहे की एखाद्या ग्रहावर सजीवांची निर्मिती होऊन त्यांची उत्क्रांनी होण एक फार अवघड आणि जटील प्रक्रिया आहे. पृथ्वीवर सजीव नेमके केव्हा आले असतील? त्याची उत्क्रांती कशी झाली असेल? जीवशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की पृथ्वीवर एक पेशीय जिवाणू सुमारे ४.१ ते ३.५ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असतील. सुमारे ५० कोटी वर्षांपूर्वी समुद्रात माशासारख्या सजीव आले असतील. मानवाचे पूर्वज माकड सुमारे ५ कोटी वर्षांपूर्वी वगैरे. हे आकडे वाचल्या वर आपल्याला खरच खूप काही कळलं का? कदाचित नाही. कारण इतक्या मोठ्या आकड्यांसी आपला संपर्क वरचे वर येत नसतो. पण हेच जर आपण या आकड्यानां वेगळ्या स्वरूपत बघितलं तर? समजा आपण पृथ्वीचा हा ४.६ वर्षांचा इतिहास आपण एका वर्षात मांडला तर? म्हणजे १ जानेवारी रोजी जेव्हा वेळ ० तास ० मिनीटे आणि ० सेकंद होती तेव्हा पृथ्वीचा (आणि अर्थातच सौरमालेचा) जन्म झाला. आणी आज आपण ३१ डिसेंबरच्या २३ वा. ५९ मि. आणि ५९.९९.... सें वर आहोत. तर या कालखंडात पृथ्वीर सजीवांची उत्क्रांती कशी झाली असेल. सुरवातीला पृथ्वी खूप तप्त होती. तिला थंड होण्यासच सुमारे दोन महीने लागले. एक पेशीय जिवाणू मार्च महीन्याच्या शेवटचा आठवडा ते एप्रिल महीन्याच्या पहिल्या आठवडा या कालावधीत आले असतील. त्या नंतर सुमारे सहा महीने पृथ्वीवर काहीही घडल नाही. नोव्हेबर महीन्याच्या सुमारे पहिल्या आठवड्यात एक पेशी सजीवांची म्हणजे शेवाळ यांची पाण्यात निर्मिती झाली. आणि असे करत आपली सिव्हीलायझेश फक्त ६ सेकंदा पूर्वीची आहे. तर या प्रमाणात पृथ्वीच्या उत्क्रांतीचा इतिहास हा फक्त दीड महीन्याचा आहे जो अत्यंत रोचक पद्धतीने मांडला आहे उतक्राती या पुस्तकात सुमती जोशी यांनी.

त्या आपल्या मनोगतात म्हणतात ते अगदी खरे आहे की या विषयावर मराठीत फारसे लेखन झालेले नाही आणि त्यानी ही उणीव भरून काढण्याचा चागला आणि उत्तम प्रयोग केला आहे. अजूनही अशा प्रकारचे लेखन आवश्यक आहे आणि या विषयातील तज्ञानी असे लेखन करून मराठी वाचकांच्या समोर हा विषय आपापल्या पद्धतीना मांडावा. पण सुमती जोशीनी केलेले हे योगदान मला खरच बहुमोलाचे वाटले. हे पुस्तक वाचताना मला भाषा आधुनमधून आलंकारिक वाटली खरी, कदाचित ती या साहित्याची गरच असेल, पण तेव्हडीच.

पुस्तक खरच वाचनीय आणि नंतर अभ्यास करण्यासारखच आहे. लेखिका एके ठिकाणी म्हणते की उत्क्रांनी हा विषयच असा आहे की, येथे 'चक्षुवैंसत्यम्' असे काही नसतेच. त्या मुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुराव्याची साखळी जोडत तर कधी या साखळीचा हरवलेला आकडाशोधत उत्क्रांतीचा इतिहास उभा करण म्हणजे एखादी रहस्य कादंबरी लिहीण्यासारख आहे आणि त्याच उत्कंठेने तो वाचण्याचा आनंद हे पुस्तकातून मला मिळाला. आणि तरी ही उत्क्रांतीतील प्रत्येक प्रकरण आपल्यात परिपूर्ण आहे अस मला वाटलं.

प्रास्ताविक या पहिल्या प्रकरणात आपली ओळख या क्षेत्रात जे प्रमुख कार्य झाले, जे विचार मांडण्यात आले आणि त्यातील काहीं विचारांना झालेल्या प्रतिरोधाचा आढावा घेण्यात आला आहे. दुस-या प्रकरणात आपली ओळख चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड वॅलॅसशी करून देण्यात येते. वॅलॅस हा डार्विन पेक्षा १४ वर्षानी लहान. दोघानी स्वतंत्र पणे संशोधन केले. दोघानी थॉमस माल्थस या अर्थतज्ञाच्या लोकसंख्यावाढीचा सिद्धांत वाचला होता. त्याना तो पटला होता. त्या मुळे असेल त्या दोघाच्या सिद्धांतात कमालीचे साम्य. फक्त डार्विनने आपले शोघकार्य प्रसिद्ध केलं नव्हतं. जर वॅलॅसने आपले कार्य प्रसिद्ध केले असते तर त्याला सेंद्रिय उत्क्रांतीच्या सिद्धांतचे श्रेय मिळाले असते. पण त्याला ते मान्य नव्हते. या सर्वांची चर्चा योग्य पद्धतीने, अजीबात मीठ मसाला न लावता, या प्रकारणात केली आहे. पण माल्थसच्या सिद्धांताची आपली प्रत्यक्ष ओळख मात्र नैसर्गिक निवड या ६ व्या प्रकरणात होते.

दुस-या प्रकरणा नंतर आपण एक प्रकारे अभ्यासाच्या दिशेने वळतो. अनुवंशिकता (म्हणजेच आई-वडिलांचे गुण मुलात येणे), विभेदन (आई-वडिलांशी साम्यअसले तरी मुलांच वेगळे असणं) आणि त्याचे रहस्य. ४थ्या प्रकरणा पासून उत्क्रांनीच्या मार्गावर नैसर्गिक निवडीचा नियम आणि तो सिद्धकरता येईल का आणि कृत्रिम निवड यावर चर्चा आपण वाचतो. जीवन संघर्षात टिकून राहण्यासाठी सजीवांनी आपल्यात केलेल्या बदलांची फार सुदर चर्चा अनुकूलन या प्रकरणेत लेखिकेने केली आहे.

सेंद्रिय उत्क्रांतीचे पुरावे हे १०वे प्रकरण मला खूप महत्वाचे वाटले. हे प्रकरण वाचल्यावर हे शास्त्र काय आहे आणि किती अवघड आहे आणि त्याच बरोबर हे किती रोमांचक आहे याची आपल्याला जाणीव होते. नुकतेच मुंबईतील दोन विद्यार्थ्याना विंचवाची एक नवीन प्रजाती सापडल्याची बातमी होती. या शोधाचं महत्त्व हे प्रकरण वाचल असल्या मुळे मला जास्त प्रकर्षाने जाणवलं.

डिझाइननॉईड घटक आणि डार्विनचे फिंच पक्षी ही दोन्ही प्रकरणे वाचताना डिसकव्हरी किंवा एनिमल प्लॅनेट चे एखादे एपिसोड वाचत असल्याचा भास होतो. उपसंहार हे सुमारे चार सव्वाचार पानाचे हे १३वे प्रकरणात एक स्वतंत्र लेखच आहे. शेवटी - पुस्तकाच्या शेवटीजी शब्द सूची आणि संदर्भ सूची देण्यात आली आहे ती नक्किच उपयोगी आहे पण या सूची विशेषतः शब्द सूची आणखीन मोठी असती त्याच बरोबर निर्देश सूची दिली असती तर फार चांगल झाल असतं अस मला वाटतं.

आज आपण, विद्यार्थी आणि विज्ञानाची आवड असलेली मोठी माणस सुद्धा डिसकव्हरी, अँनिमल प्लॅनेट वरील कार्यक्रम फार आवडीने बघतो. निसर्गाबद्दलचे कार्यक्रम बघताना हे पुस्तक वाचले असल्यास ते जास्त चांगले कळण्यात मदत होईल.

अशा प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असल्या मुळे असेल कदाचित याला पानांच्या संख्येची मर्यादा असावी पण जसे राजहंसने जनसामान्यांचे आकाशाशी नाते जुळवले तसेच त्यांचे या पृथ्वीशी पण नाते सुमती जोशीयां यांच्या माध्यामातून जुळवून देण्याचा आवश्य प्रयत्न करावा.

No comments: