मिलानोतली रात्र



मिलानो हे शहर आमचे पोर्ट ऑफ एंट्री आणि पोर्ट ऑफ डिपार्चर पॉईंट होते.  ३१ऑक्टोबरच्या रात्री आम्ही इथे राहणार होतो इतकेच.

इथे आमचे रात्रीचे जेवण  पण होणार होते.  जेवणा साठी आमचा प्रवास आता  Ristorante Indiano Aangan  च्या दिशेने सुरू झाला.  या लिंकवर केल्या वर तुम्हाला हे हॉटेल नेमक कुठे आहे ते गूगल मॅपवर दिसेल. पण ह्या रेस्तॉरॉते पर्यंत ड्रायव्हर ला बराच वेळ लागला.  एक तर त्याला गूगल मॅप वरून नक्की जागा सापडत नव्हती आणि मग त्याच्या समोर पार्किंग का प्रश्न उभा होता.



आम्ही ३-४ वेळा तरी हॉटेलच्या जवळून गेलो असु.  तिथे रात्रीचे ९-३० वाजायला आले होते.  म्हणजे आपल्या कडेचा रात्रीचा १.  प्रत्येक जण सकाळी सुमारे ४ चा उठलेला म्हणजे आमचा एकूण दिवस आता तसा २१ तासांचा झाला होता. आणी हळु हळू आमचा धीर आता खचत आलेला होता.

इकडे टूर लीडरची पण तारांबळ उडालेली कारण तिकडे हॉटेलचा मालक वाट पहात होता. शेवटी आमच्या टूर लिडर ने  हॉटेल मालकाशी संपर्क साधला आणि मग ड्रायवर आणि हॉटेल मालकाशी बोलला.  थोडक्यात आम्ही कयास केला की हॉटेल समोर बस लावायला जाग नव्हती पण हॉटेल मालकाने सांगीतलं असावं की बस खुशाल रस्त्याच्या कडेस हॉटेलला चिकटवून उभी कर बाकी मी बघतो.  बस मग अर्धी रस्त्या वर व अर्धी फुटपाथ वर उभी करण्यात आली.

बाकी हॉटेल चांगलच होतं अस म्हणायला पाहीजे.  हॉटेलचा रखरखाव आणि सजावट छान होती आणि जेवणा उत्तर हिन्दुस्तानी पद्धती चवदार होतं.





 



प्रत्येक जण आपापल्या भुके प्रमाणे जेवला.  आणि सुमारे तासभाराच्या आत आम्ही आपल्या हॉटेल कडे रवाना झालो.

दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आम्हाला सांगण्यात आला आणी मुख्य म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट ची वेळ जरी ८-३० ची असली तर आपल्या वेळे प्रमाणे ती दुपारी १२ ची होते हे लक्षात आल्यावर सगळ्यानाच हायस वाटलं.











मुंबई ते मिलानो

३१ ऑक्टोबर २०१९

आमच्या प्रवासाला ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५-३० वा सुरू झाली जेव्हा आम्ही मुंबई विमानतळा कडे घरून प्रयाण केले.  आमच्या सवयी प्रमाणे आम्ही दिलेल्या वेळेच्या बरच आधी विमानतळावर होतो.  कालांतराने वीणा वल्डची मंडळी  आली.

वीणा वर्डची लोक आणि आमचा टूर लीडर आम्हाला क्रमांक ४ च्या स्थानका वर भेटणार होते. याच ठिकाणी भारताचा झेंडा पण  असतो.

आम्हाला आधीच सांगण्यात आल्या प्रमाणे इंशुर्न्सचे कागद आणि काही खाद्य पदार्थ देण्यात आले.  आम्ही पहिले आलेल्यां पैकी असल्या मुळे आम्हाला आमचे कागद आणि खाण्याच साहित्य पण लगेच मिळाले आणी ते  घेऊन विमानतळाच्या पहिल्या एंट्री पॉइंट कडे पळालो. इथून आत शिरल्या वर मग बाहेर पडण सोप नसतं.
सर्व प्रथम चेक इन केल कारण  खिडकीची जागा पकडायची होती. तशी ती मिळाली पण.

त्या नंतर सिक्युरीटी चेक - एमिग्रेशन वगैरे सोपस्कार संपवून मोकळे झाल्यावर भूक खूप लागलेली असल्या मुळे तिथल्या हॉटेल कडे धाव घेतली.

मुंबईचे विमानतळ अप्रतिम आहे यात वाद नाही आणि गेल्या काही वर्षा आता फोट काढायला मुभा असल्या मुळे फोटो हे काढले जातातच.




अजून सहप्रवाशांची ओळख अशी झालेलीच नव्हती. हं पण हे आपल्या बरोबर इटलीला असणार आहेत हे लक्षात येउ लागल होत.  तसे सगळेच मराठी भाषिक होते.

आणि आमच्या टूर लीडर पण बरोबर होताच.

कालांतराने ओमान एयरच विमानही एयरो ब्रिजला लागलं.


ठरल्या वेळे प्रमाणे ओमान एयरच्या प्लाईट क्रमांक WY-202 ने मुंबई हून १०-३० च्या सुमारास टेकऑफ केले. तो छान झाला आणि आम्ही मुंबई आणि त्याच बरोबर देश सोडला.

आमच्या प्रवासाची आता खऱ्या अर्थाने  सुरवात झाली होती.

हा प्रवास जवळ जवळ संपूर्ण अरबी समुद्रावरून असल्या मुळे खिडकीतून दूर दूर पर्यंत फक्त समुद्रच दिस होता.





सुमारे अडीच तासाचाच्या प्रवासा नंतर परत जमीन दिसु लागली व
मग थोड्याच वेळात  आम्ही मस्कत विमानतळावर उतरलो. स्थानिक वेळ दुपारचे १२.

विमानतळावर पोचल्या वर टूर लीडर नचितकेत ने सर्वांची हाजेरी घेतली.  त्या वरून आपल्या बरोबर कोण कोण आहे याची थोडी कल्पना आली.

हे विमानतळ इतर विमानतळांपेक्षा फार वेगळ मात्र नव्हतं.







 
प्रत्येक विमानतळावर अर्थातच काही वेग दिसत किंवा लक्षात येतं.   एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे हिंदी मधून प्रवेश निषेध आणि तेच बांग्ला मधून पण. याचा अर्थ आपण समजू शकतो की इंग्रजी न कळणारे हिदी आणि बांग्ला भाषी लोक बहू संख्येने येत असणार.


इथे प्रवाशांसाठी बसण्याची काही वेगळी आसने होती. ती  दिसायला  जरी आकर्षक वाटली तरी  त्याचा फारसा वापर होताना दिसला नाही.

















खरतर बसल्या वर पाठीला छान वाटत होतं पण प्रवसात ज्या आरामाची गरज होती ती गरज मात्र ही आसन पूर्ण करत नव्हती.


आमचा पुढचा प्रवास मग तीन तासांनी सुरू झाला.  हा प्रवास आता साडे सात तासांचा होता.  आणि हो उत्तरेस होत असल्या मुळे बाहेर अंधार पण लवकर झाला.  आता मधे मधे विमानातील खान पान सेवा वगैरे सुरू होती. अनेक जण खुर्ची समोरच्या स्क्रीनवर लोकांचं सिनेमा, सीरीयल बघण्यात पण मग्न होती. या स्क्रीन वर विमानाचा प्रवास कसा होत आहे हे पण दाखण्यात येत होतं.



आमचा प्रवास आता उत्तर पश्चिम दिशेने होत होता. त्यात या  दोन शहरांनी माझं लक्ष वेधल. एक होत तुझला आणि दुसरं बन्जा लुका.

स्थानिक वेळे प्रमाणे आम्ही सुमारे सायं ७-३० वा मिलानो ला पोचलो.  पण इटलीची वेळ भारताच्या ३-३० तास मागे असल्या मुळे आमच्या साठी मात्र रात्रीचे ११ वाजले होते.  इटलीतदेशात प्रवेश करण्या पूर्वीचे सोपस्कार म्हणजे एमिग्रेशन वगैरे करून मग आपले सामान घेऊन बाहेर पडण्यात सुमारे तास भर गेला.

विमानतळा बाहेर असलेल्या बस कॅप्टनची ओळखकरून दिली.  आता पुढचे ७ दिवस आमचा याच बसने प्रवास होणार होता.

















मिलान - व्हेनिस - पादोवा

१ नोव्हेंबर २०१९ 

मिलान - व्हेनिस - पादोवा


जेव्हा आपण दुसऱ्या देशात जातो तेव्हा आपले घड्याळ त्या देशाच्या घड्याळा प्रमाणे लावल तर सगळ्याच बाबतीत खूप सोय होते.  आता स्मार्ट फोन मुळे हे खूप सोप झाल आहे.

मला जेव्हा जाग आली तेव्हा स्थानिक वेळे प्रमाणे सकाळचे ४ वाजले होते. भारतात ७-३०.  बाहेरच तापमान छान गार असे १२ अंश होते.

आज पासून आमच्या इटली यात्रेला सुरवात झाली.  या दर्म्यान योगेशने आम्हाला युरोप कसा शिस्तप्रीय देश आहे - आपण कस वागावं, काय कराव किंवा करू नये या बद्दल अनेक सुचना दिल्या होत्या. ज्या बहूतांशी बरोबर पण ठरल्या. पण हा देश बऱ्या पैकी आपल्या देशा सारखाच आहे.  संधी मिळेत तेव्हा आपल्याला जमेल तस वागावं.  नेप्लस तर अगदी पुणं. हेल्मेट घाला म्हंटल्यावर घालणार नाही ही प्रवृत्ती. त्या बद्दल आपण बोलुच पुढे.

ब्रेकफास्ट सगळ्या तारांकित हॉटेलांमध्ये असतो तसा.  ब्रेड, कॉर्नफ्लेक्स, अंडी, फळाचा रस (पॅकेट मधला) वगैरे.   आम्ही मिलानो ९-३० च्या सुमारास सोडलं ते व्हेनिसला जाण्यासाठी.  व्हेनिस म्हंटलं की मर्चंट ऑफ व्हेनिस हे शेक्सपियरच नाटक आणि जेम्स बॉण्डच कसिनो रोयाल एकदा तरी मनात डोकावून जातात.  पण त्याच बरोबर आठवण येते ती की इथेच गेलिलियोने आपण बनवलेली दुर्बिण व्हेनिसच्या श्रेष्ठीन समोर ठेवली होती.

मिलानो सोडल्या सोडल्या वाटेतच डावीकडे डेव्हेरो हॉटेल दिसलं. त्यावर वरती दुसऱ्या क्रमांकावर भारताचा झेंडा दिसला आणि पटकन फोटो काढण्याचा मोह अनावर जाला.

आम्ही सुमारे २० - २५ किलोमीटरच गेलो असु तेव्हा ड्रायवरच्या लक्षात आलं की वाटेत पुढे कुठे तरी अपघात झाला आहे आणि ट्रॅफिक त्या मुळे हळू जात आहे. त्याने  रस्ता थोडा बदलला पण फार काही फरक पडला नाही.

असो. शहर थोड मागे पडल्यावर मग स्वयं परिचयाचा कार्यक्रम सुरू झाला.  अनेकांनी या पूर्वी पण वीणा वल्ड बरोबर प्रवास केला होता आणि त्यांनी आपल्याला अनुभव चांगला आला आणी म्हणून ते परत या सहलीला आहे होते.

एकमेकांच्या आवडी निवडी प्रमाणे मग थोड ध्रुवीकरण पण सुरू झालं. अर्थात  एक मोठ ध्रुवीकरण म्हणजे महिला वर्गाच होतं.




आम्ही दीडच्या सुमारास पादोवाला पोचलो. इथे आमचे जेवण रंगोली या इंडियन रेस्टॉरेंट मधे होते.
या रस्त्याच्या शेवटी या रस्त्याच्या शेवटी Sanctuary dell'Arcella, हे रोमन कॅथलिक चर्च आहे. याला सेंट एन्तोनिनो म्हणून ओळखतात. हे चर्च सेंट एंथनी ऑफ पादोवा यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. सेंट एंथनी हे पोर्तूगीज कॅथलिक प्रीस्ट आणि फ्रायर होते. फ्रायर म्हणजे आपल्या कडे जसे भिक्षुक असतात तसे. स्वतःचे कमीत कमी सामान, ब्रह्मचर्याचे पालन आणि आज्ञेच काटेकोर पण पाल करणाचे कॅथलिक धर्मगुरू असतात. चर्च मध्ये सेंट एथनी ऑफ पादोवा यांचा १३ जून १२३१ रोजी ज्या खोलीत मृत्यू झाला ती खोली जपून ठेवली आहे. त्यांचा जन्म लिसबन मधे झाला होता.

 रंगोली हे हॉटेल रस्त्याच्या कोपऱ्यावर आहे. इथून चर्च कडे जाताना डाव्या बाजूस Sushi Arcella हे जॅपनीज रेस्टॉरंट पण आहे.


युरोप मध्ये सहसा लोक झेब्र क्रॉसिंगवरच रस्ता ओलांडलात दिसतात आणी तो ही दिवा हिरवा झाल्यावरच. ट्रॅफिक लाईटच्या जवळ एक बटन असतं तुम्हाला रस्ता ओलांडायचा असेल तर ते बटन तुम्ही दाबायच मग ट्रॅफिक सिग्नलची कंप्यूटर योजना ठरवते की केंव्हा इतरांसाठी दिवा लाल करून  तुमच्या साठी दिवा हिरवा करायचा.  आणि तरी ही काही सायकल स्वार विरूद्ध दिशेने जाताना किंवा लाल दिवा असताना जर सटकता आलं तर सटकणारे वीर आणि विरांगना पण होतेच.







Day 2 : 01-Nov-2019, Milan 􀂱􀀃Venice 􀂱􀀃Padova (1 Night)
Today we leave for Venice to enjoy the Vaporetto water bus ride to Venice Island and the Gondola ride in the famous canals of Venice.
Later we visit the Glass blowing factory and the walking city tour which includes Bridge of Sighs, Doge's Palace, Bell Tower, St. Mark's
Square and the Basilica. Then we leave for Padova
Veena World Treats :
Gelato Ice cream at the Venice Island.
Meals :
* BreakFast * Lunch * Dinner