मिलानो हे शहर आमचे पोर्ट ऑफ एंट्री आणि पोर्ट ऑफ डिपार्चर पॉईंट होते. ३१ऑक्टोबरच्या रात्री आम्ही इथे राहणार होतो इतकेच.


आम्ही ३-४ वेळा तरी हॉटेलच्या जवळून गेलो असु. तिथे रात्रीचे ९-३० वाजायला आले होते. म्हणजे आपल्या कडेचा रात्रीचा १. प्रत्येक जण सकाळी सुमारे ४ चा उठलेला म्हणजे आमचा एकूण दिवस आता तसा २१ तासांचा झाला होता. आणी हळु हळू आमचा धीर आता खचत आलेला होता.
इकडे टूर लीडरची पण तारांबळ उडालेली कारण तिकडे हॉटेलचा मालक वाट पहात होता. शेवटी आमच्या टूर लिडर ने हॉटेल मालकाशी संपर्क साधला आणि मग ड्रायवर आणि हॉटेल मालकाशी बोलला. थोडक्यात आम्ही कयास केला की हॉटेल समोर बस लावायला जाग नव्हती पण हॉटेल मालकाने सांगीतलं असावं की बस खुशाल रस्त्याच्या कडेस हॉटेलला चिकटवून उभी कर बाकी मी बघतो. बस मग अर्धी रस्त्या वर व अर्धी फुटपाथ वर उभी करण्यात आली.



प्रत्येक जण आपापल्या भुके प्रमाणे जेवला. आणि सुमारे तासभाराच्या आत आम्ही आपल्या हॉटेल कडे रवाना झालो.
दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आम्हाला सांगण्यात आला आणी मुख्य म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट ची वेळ जरी ८-३० ची असली तर आपल्या वेळे प्रमाणे ती दुपारी १२ ची होते हे लक्षात आल्यावर सगळ्यानाच हायस वाटलं.
No comments:
Post a Comment