खगोलशास्त्राच्या संबंधीत काही वेबसाईट

अनेक जण खगोलशास्त्राशी निगडीत असलेल्या वेबसाईट बद्दल चौकशी करतात.  काही वर्षांपूर्वी जेव्हा कोणी असा प्रश्न विचारायचे तेव्हा माझ उत्तर असायच की अरे एखाद्या सर्च इंजिन (गूगल वगैरे ..) वर शोधा. तुम्हाला अनेक साईट सापडतील.  पण काळाबरोबर आता अनेक वेबसाईट तयार झाल्या आहेत - होत आहेत आणि त्या मुळे नेमक्या उपयोगी साईटची निवड कदाचित अवघड होऊ शकते. तर माझ्या आवडीच्या काही वेबसाईट बद्दल माहीती देत आहे.
यातील पहीली वेबसाईट - अर्थातच http://www.avakashvedh.com/  - अर्थातच म्हणायच कारण अस की खगोलशास्त्राचा छंद असणाऱ्या जवळ जवळ प्रत्येक मराठी वाचकाला ही साइट माहित असण्याची शक्यता आहे.  माझ्या मते खगोलशास्त्राच्या छंदा बद्दल संपूर्ण पणे माहीती देणारी मराठी भाषेतील पहिली आणि एकमेव उकृष्ठ साईट आहे. ही  साइट तुम्हाला खगोलशास्त्राचे ज्ञान वाढवण्यास फारच उपयुक्त ठरेल. यात तुम्हाला आकाशात ग्रहतारे कुठे दिसतील. त्यांच्या बद्दलची माहती, खगोलशास्त्र आणि निरक्षणांसबधी लेख वाचायला मिळतील. या शिवाय प्रश्नोत्तरे, खगोलशास्त्रावरील स्पर्धा, भारतीय खगोलशास्त्राज्ञांबद्दल माहीती असे अनेक स्थंभ या साइटवर आहेत.
आणि गम्मत म्हणजे एका खगोलप्रेमी वेड्याने फक्त स्वतःच्या हिमती वर ही साइट केली आहे. त्याच नाव आहे  सचिन सखाराम पिळणकर. या माणसाचा मोठेपणा असा की तो साइच वरच लिहीतो की " कमी ऐवजी जास्त चुका माझ्या हातून होण्याच्या शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी माहितीमध्ये छोटीशी देखिल चूक आपणास आढळून आल्यास कृपया मला कळवावे. कोणताही शब्द चुकीचा टाईप झाल्यास ( व्याकरण चुकल्यास ) मला कळवावे. आपण दाखविलेली प्रत्येक चूक लगेच सुधारण्यात येईल."  आणि हे खोट आश्वासन नव्हे - तो हे कृतीत पण आणतो. या साइटला बक्षिसे पण मिळाली आहेत पण त्याचा गवगवा सचिने केलेला नाही..
या साइट बद्दल जर तक्रार करायची असेल तर इतकीच की आता हिचा चेहरामोहरा बदलावा. काळ्या पार्श्वभागावर पांढ-या किंवा लाल अक्षरात वाचण थोड किचकट वाटतं.
बिल अरनेट (Bill Arnett) यांची नाईन प्लॅनेट ही साइट ( http://nineplanets.org/ )  ही आपल्या सूर्य मालेच्या माहीती बद्दल एक अंत्यंत महत्वाची आणि विषेशतः शालेय विद्यार्थांसाठी तर फारच उपयुक्त साइट आहे.  एका सूत्र बद्ध पद्धतीने अरनेट यांनी या साइटवर आपल्या सूर्यमालेची माहीती दिली आहे.  मुख्य म्हणजे या साइटचा कुठला ही कॉपी राईट नाही आणि तुम्ही अगदी स्वतंत्र पणे या साइटचा उपयोग तुमच्या शाळेच्या प्रकल्पासाठी करू शकता किंवा तुमच्या शाळेची जर एखादी साइट असेल त्या वर या साइटची लिंक देऊ शकता. या साइटवर अरनेटयांनी प्रामुख्याने नासाची चित्र वापरली आहेत म्हणजे ही चित्र पण तुम्ही कुणाची पूर्व परवांगी न घेता विज्ञान प्रकल्प किंवा विज्ञान प्रसारा साठी वापरू शकता. या साइटवर ग्रहांचा आणि ग्रहमालेतील इतर घटकांची  विविध प्रकारे केलेली तुलनात्मक सारणी सापडेल.
या साइटचा एक वेगळा इतिहास आहे. गेल्या सुमारे २० वर्षात यात गरजे प्रमाणे बदल होत गेले आहे नवीन शोधांबदल माहीती लगेच इथे अपडेट होते.  जेव्हा २००६ साली ग्रहांची नवीन व्याख्या करून ग्रहमालेत नवीन बटू ग्रह हा नवीन गट बनवण्यात आला तेव्हा तो बदल या साइट वर लगेच करण्यात आला.
या साइटचा आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे या साइट वर तुम्हाला इतर अनेक लिंक सापडतील.
शेवटी या साइटवर तुम्हाला आजच्या विज्ञानाला न सुटलेल्या प्रश्नाची चर्चा केली आहे. जर तमचा कल शास्त्रज्ञ बनण्याच्या दिशेने असेल तर हे प्रश्न नक्की वाचा - अगदी खगोलशास्त्रात करीयर करू इच्छित नसाल तरी कारण या प्रश्नावरून तुम्हाला संशोधन कसे करतात याची चुणुक मिळेल.  

दर रोज आपल्या समोर एक नवीन सुंदर खगोलीय चित्र सादर करणारी ही एस्ट्रोनोमी पिक्चर ऑफ द डे  ( apod.nasa.gov/ ) साइट दोन शास्त्रज्ञ रॉबर्ट आणि जेरी बोनेल यानी बनवलेली आहे. या साइटवर प्रत्येक चित्रा सोबत त्या चित्रा बद्दलची शास्त्रीय माहीती पण देण्यात येते. या साइट वरची प्रामुख्याने नासा ने घेतलेली आणि कुणालाही  वापरता येतील अशीच आहेत पण कधी इतर चित्रे ही इथे सापडतात. या साइटचा चित्रांचा संग्रह आता खूप मोठा आहे. त्याचा उपयोग शाळा कॉलेज च्या प्रकल्पांसाठी किंवा प्रदर्शनांसाठी करता येउ शकतो.
जर तुम्हाला नवीन धूमकेतू शोधायला आवडणार असेल तर ( http://sungrazer.nrl.navy.mil/ ) या साइटला आवश्य भेट द्या. या साइट वर  युरोपियन स्पेस एजंसी आणि  नासा यांच्या अंतराळातील सोलार एंण्ड हीलिओस्फेरिक वेधशाळे ने घेतलेल्या चित्रात तुम्हाला धूमकेतू शोधायची संधी मिळते.  त्या साठी तुम्हाला एक संगणक आणि इंटरनेट कनेक्शन पाहिजे.  धूमकेतू कसा शोधावा या संबंधीची सर्व माहीती या साइटवर आहे.
भारताच्या संद्रभात आयुकाच्या विज्ञान प्रसाराच्या साइटला ( http://www.iucaa.ernet.in/~scipop/ ) आवश्य भेट द्या. या साइटवर तुम्हाला प्रमुख्याने आपल्या आजूबाजुला काय घडत आहे तसेच आयुकाच्या कुठल्या कार्यक्रमात तुम्हाला भाग घेता येइल  याची माहिती मिळेल. इथली एक महत्वाची लिंक म्हणजे जर तुम्हाला खगोलशास्त्रज्ञ व्हायच असेल तर तुम्ही काय केल पाहिजे.
आणि अगदी शेवटी मी दोन साइटचा उल्लेख करीन एक म्हणजे http://skytonight.wordpress.com/ या साइटवर आकाशनिरिक्षणांसबंधी माहीती, दर महिन्याचे आकाश या बद्दल माहीती आहे.  तर https://sites.google.com/site/diy100atm/ तुम्हाला स्वतःची दुर्बिणी कशी बनवायची या बद्दल माहिती मिळेल. या दोन्ही साइट माझ्या आहेत पण मी इथे हे  पण कबूल करतो की या दोन्ही साइट अजून पूर्ण नाहीत.

No comments: